123 456 789

info@example.com

Goldsmith Hall

New York, NY 90210

07:30 - 19:00

Monday to Friday

Principle Desk

सन्मा . प्राचार्यांचा संदेश

आम्ही चालवू हा पुढे वारसा .....

                भारतीय संस्कृती प्राचीन आहे .गुरु-शिष्य परंपरासुद्धा तेवढीच प्राचीन आहे .या संस्कृतीत आश्रम व्यवस्थेत स्थिरावलेले गुरु शिष्य कालप्रवाहाबरोबर , आजच्या शिक्षण व्यवस्थेपर्यंत स्थिरावत आहेत . शिक्षण हा व्यक्तीमत्व विकास आणि एकूणच जडण घडणीचा प्रभावी संस्कार असलेने शिक्षण या संज्ञेचे महत्व आजही टिकून आहे .माणूसपणासाठी आवश्यक असलेल्या संस्कारांचे भारपोषण उत्तम पद्धतीने होण्यासाठी या परंपरेचे महत्व आजच्या आधुनिक भौतिक आणि यांत्रिक युगात हि प्रभावी आहे . उत्तम ,संस्कारी ,चारित्र्यसंपन्न कालानुरूप ज्ञानलालसा जोपासणाऱ्या ,अध्ययनशील ,विविध कलागुण धारण करणाऱ्या ,दूरदृष्टीने आणि कल्पकतेने मुलांची जडण घडण करणाऱया ,संस्कृती,नेतृत्व फुलवणाऱ्या अध्यापकांची आजही नितांत आवश्यकता आहे .अध्यापक विद्यालये त्या दृष्टीने सतत प्रयत्नशील आहेत .

               आमचे ” मराठा मंदिर ” संस्थेचे स .रा . देसाई अध्यापक विद्यालय ,रत्नागिरी सारख्या ग्रामीण तरीही निसर्गसंपन्न वातावरणात कार्यरत आहे . अध्यापक विद्यालये म्हणजे आम्हा शिक्षकांची शिक्षकी पेशाच्या उभारणीची पवित्र तीर्थस्थळे असतात .उत्तम, परिणामकारक ,काळाशी सुसंगत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य गेली सुमारे साठ वर्षे आमचे अध्यापक विद्यालय करीत आहे . प्रभावी आध्यापनसाठी आवश्यक असणाऱ्या उपक्रमाचे माहेरघर म्हणून या विद्यालयाला महाराष्ट्रभर ओळखले जाते . अध्यापनाचा उत्तम दर्जा ,आधुनिक ज्ञान -विज्ञान आणि तंत्रज्ञनाची कास धरणाऱ्या मोजक्या विद्यालयांमध्ये या विद्यालयाची ख्याती आहे .प्रथम -द्वितीय वर्षाच्या दोन तुकड्या असणारे आमचे अध्यापक विद्यालय आहे .

                   आमच्या अध्यापक विद्यालयातून दोन वर्षांचे अध्ययन करून बाहेर जाणारे विद्यार्थी केवळ शिक्षकच होतात असे नाही ,तर पदवी -पदव्युत्तर पदवी ,पी .एच .डी .,सेट , नेट अशा उच्च शैक्षणिक अहर्ता धारण करून अधिव्याख्याता ,जबाबदार पदावरील अधिकारी म्हणून कार्यरत असणारे अनेक विद्यार्थी आहेत .रत्नागिरीचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्री .एकनाथ आंबोकर ,अभिनय क्षेत्रात नाव कमावलेले श्री .वैभव मांगले ., अशी काही मोजकी उदाहरणे देता येतील . केंद्र प्रमुख ,विस्तार अधिकारी ,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असणारे अनेक अधिकारी ,प्राचार्य ,सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रात विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. मराठा मंदिर ,स .रा . देसाई अध्यापक विद्यालयाचे स्नेहबंध आम्ही कधीच विसरणार नाही ,असे आवर्जून सांगणारे विद्यार्थी आजही भेटतात .विद्यालयाच्या प्रगती साठी आवश्यकते सहकार्य करतात .कोणत्याही विद्यालयाची गुणवत्ता सिद्द हिते ती अशा क्रियाशिल ,उपक्रमशील आणि गुणवंत विद्यार्थांमुळेच .या सर्व गोष्टींचा या अध्यापक विद्यालयाची प्राचार्या म्हणून मला सार्थ अभिमानच आहे .

               ‘ मराठा मंदिर ‘ ही संस्था शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य आहे . महाराष्ट्रभर शिक्षण संस्थेचा नाव लौकिक आहे . या लौकिकाला साजेसे शैक्षणिक कार्य आम्ही सर्वानी पुढे चालू ठेवले आहे . या सर्वासाठी आवश्यक असते ते संस्थेचे सहकार्य .आमची संस्था शैक्षणिक गुणवत्तेसाठी कधीच तडजोड करीत नाही .संस्थेने सर्व सुविधा संपन्न स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत .आवश्यक असणाऱ्या सर्व शैक्षणिक अहर्ता धारण करणारे अभ्यासू प्राध्यापक ,मनमिळाळू कर्मचारी यांना बरोबर घेऊन शिक्षण क्षेत्रात यशस्वी व उत्तम वाटचाल करण्याचे भाग्य केवळ आमच्या मराठा मंदिर संस्थेमुळेच मला मिळाले ,म्हणूनच आम्ही पात्र ठरलो याची जाण या अध्यापक विद्यालयाची प्राचार्या म्हणून मला आहे . यापुढेही या सर्वांचे उत्तम सहकार्य या पवित्र कार्यात मला मिळेल अशी खात्री आहे . महाराष्ट्र शासन ,संस्था ,विद्यार्थी ,पालक ,समाज या सर्वांच्या सहकार्याने ,सहयोगाने संस्काराचा हा वारसा पुढे चालवण्याचे बळ आम्हास मिळेल ,अशी सार्थ श्रद्धा व्यक्त करते …..

                                                                                              धन्यवाद .

                                                                                                                                                                                                                   सौ . मंजिरी प्रमोद साळवी .
( प्राचार्या )